हरवलेला रस्ता ...............!
काही तरी वेगळ करायचं बस. समोर दिसतंय तिथे पर्यंत पोहचायचं. मग रस्ता कसाही असो.
आता
तुम्ही विचार करत असाल काहीतरी वेगळच करायला चाललाय हा. तर मग बरोबर विचार
केला तुम्ही. आम्ही पण असाच काही तरी ठरवल होत. कदाचित मी FY ला असतानाची गोष्ट आहे हि. जोडीला होता तो राकेश
देऊलकर. माझाच सवंगडी, माझ्याच वयाचा. एकत्रच लहानाचे मोठे झालो आम्ही.
राहतो पण आम्ही एकमेकांच्या घरांसमोर, तो माझ्या अन मी त्याच्या. फक्त मध्ये
आहे तो SH १२१ .
लहानपणापासून आम्ही एकत्रच खेळत आलो. आणि आता
एकत्र फिरतो ही. आमच्या आवडी - निवडी हि जवळपास सारख्याच. त्यामुळे आमच
चांगलच पटत. त्यामुळे काही करायचं असेल तर आम्ही पुढेच. असा कोणता भाग नाही
जिथे आम्ही गेलो नाहीत. आंबोली सारख्या भागाची प्रत्येक बाजून -
बाजून पिंजून काढली आम्ही. आता विचार चालू होता तो जरा बाहेरच्या जागा
पाहण्याचा. आणि अशातच विचार आला तो म्हणजे मनोहर - मनसंतोष गडाचा.
जांभुळ खाण्यासाठी
आम्ही बरयाच वेळा महादेव गड पॉईट वर जायचो. आणि अश्यातच नेहमी
विचार यायचा तो म्हणजे "कि कधीतरी जो समोर किल्ला दिसतो तिथे जायचं." तस
बघायला गेल तर त्या किल्ल्याच्या पायथ्या पर्यंत गाडी जाते. सावंतवाडी हून
तुम्ही बस पकडून गोठवे म्हणून गाव आहे तिथ पर्यंत येऊ शकता. आणि तिथून दीड
तासाच्या चढाई वर तुम्ही किल्ल्यावर पोहचू शकता. आणि हे आम्हाला पण चांगलच
माहित होत. पण म्हणतात ना कधी तरी किडा करावा माणसाने. तसच काही तरी होत
आमच. तर शेवटी मन - मनोहर संतोष गड करायच आमच नक्की झालं. पण जरा वेगळ्या
पद्धतीने. तो म्हणजे महादेव गड वरून मनोहर - मन संतोष गड डोळ्यासमोर ठेऊन
वाट काढत जायची. खरतर आम्हाला या रस्त्यात येणार जंगल पहायचं होत.
तर
मग काय दिवस ठरला. एक दिवस अगोदर काय काय आणि कस कस करायचं ते ठरलं.
घरच्यांची समजूत काढावी लागली कारण आम्ही दोघेच जाणार होतो. बरयाच जणांचा
नकार आणि फारच कमी जणांचा होकार घेऊन आम्ही जायचं ठरवल. आता मला तारीख आठवत
नाही पण दिवस ठरले ते शनिवार आणि रविवार. शुकवारी रात्री आम्ही भेटलो आणि
सगळा Plan फाइनल केला. आणि म्हणता म्हणता शनिवारचा दिवस उजाडला. जवळपास ५
वाजले असावे आम्ही घरून चालायला सुरुवात केली. अजून सूर्य पण उजाडला न्हवता
आणि आम्ही तसच Torch घेऊन महादेवगडच्या दिशेने निघालो. आमच्या घराहून अंतर
आहे ३ km. घड्याळाचे काटे पाहत पाहत आम्ही मान खाली घालून चालात
राहिलो. किल्ल्यावर पाण्याची सोय नाही अस आम्ही ऐकल होतो म्हणून आणि सोबत
जवळपास ४ - ४ लिटर पाणी बाळगलं होतो. त्याच बरोबर राकेश ने सोबत २ दिवसाच
जेवण हि घेतलं होत. आणि सोबतीला बरच काही होत. कॅमेरा, चाकू, स्नेक स्टीक ,
बरीच पुस्तक, दुर्बीण, आणि बराच काही. एवढ सार वजन घेऊन आम्ही चालत रस्ता
तुडवत चाललो होतो. आणि सकाळ होता होता आम्ही एकदाचे महादेवगड वर पोहचलो.
मागच्या बाजूने सूर्य हळू हळू वर येत होता तस तसा मनोहर - मनसंतोष गड
हि दिसायला लागला होता. आम्ही जास्त वेळ तिथे न घालवता चालायला सुरुवात
केली कारण आम्हा दोघानाही माहित होत कि अंतर फार आहे आणि वेळ कमी. महादेव
गड वरून एक रस्ता दरीच्या बाजूने खाली पायथ्याला असणारया वेर्ले गावापर्यत
जातो. आम्ही तो रस्ता पकडायचा निर्णय घेऊन खाली उतरायला सुरुवात केली.
डोंगरांच्या रांगा पकडत पकडत आम्ही खाली उतरत होतो. बरीच फोटोग्राफी चालली
होती त्या वेळी आमची.
त्यावेळी काही आमच्या कडे GPS,
नकाशे किवा एकदा वाट्याडा अस काही न्हवत. आमची आम्हीच वाट काढत चाललो
होतो. ठरल्या प्रमाणे किल्ला नजरे समोर ठेऊन आम्ही त्याच्या दिशेने कूच करत
होतो. काही अंतर चालल्यावर आम्हाला कळलं कि आता पायवाट सोडायची वेळ आली
आहे. आता आमची खरी परीक्षा सुरु होणार होती कारण नसलेल्या रस्तावरून रस्ता
काढत जाणे काही खायची गोष्ट नाही. महादेवगड आणि मनोहर - मनसंतोष या मध्ये
लागणार जंगल हे तस वेगवेगळ्या प्रकारच आहे. काही ठिकाणी फक्त कारवी, काही
ठिकाणी काटेरी झाड, मध्ये कुठे तरी घनदाट जंगल. आणि त्याहून हि खराब म्हणजे
वेलींनी माखलेल जंगल. आता या सगळ्यातून वाट काढायची म्हणजे ?????? वेर्ले
गावासाठी जाणारी पायवाट सोडल्या पासून आम्ही या सगळ्याला सामोरं जात जात
रस्ता बनवत चाललो होतो. पण प्रत्येक वेळी मनोहर - मनसंतोष गड किल्ला नजरे
समोर ठेउनच. पण हे सगळ करत असताना बरच त्रास हि झाला. मला तर मध्ये अस वाटल
कि आता आपण हरवलो. याच कारण अस कि आम्ही खाली उतरायला घेतल्या पासून आम्ही
अजून लहान लहान झुडपातून चालत होतो. पण काही वेळाने आम्ही अश्या ठिकाणी
पोहचलो कि तिथून आम्हाला किल्ला दिसेनासा झाला. आणि ती जागा म्हणजे
जंगलातील मोठ - मोठाले ओहोळ. आता जायचं तरी कोणत्या बाजूला ? असे बरेच ओहोळ
पार करत करत आम्ही पुढे - पुढे निघालो होतो. अगोदरच पाठीवर ओझ आणि त्यात
हे नदीतले मोठे - मोठे दगड. त्यात राकेश ने एका ठिकाणी शेतामधला अननस काढून
घेतला. त्याच झाल अस कि रस्त्यात आम्हाला एकाची शेती लागली. आता तुम्ही
म्हणाल एवढ्या जंगलात शेती कुठून आली
? त्याच कारण अस कि हा भाग येतो कोंकणात. आणि इथल्या लोकांकडे जागा कमी
असल्या कारणाने हे लोक डोंगरात नद्यांच्या काठाने शेती करतात. तर राकेश ने
या शेतातला एक अननस काढलाच. दोघांच्या डोक्यात एकच विचार किल्ल्यावर भुक
लागली तर खायला भेटेल. आणि शेवटी राकेश ने अननस घेतलाच. म्हणाव तर वजनच
एक प्रकारच.
बराच
वेळ चालल्यावर एका ठिकाणी आम्हाला चांगलाच जंगल लागल. जंगल म्हणजे विचारूच
नका. जेवढ वरच्या बाजूला पसरलेलं तेवढच ते खाली हि पसरलेलं होत. या
सगळ्यातून वाट काढायची म्हणजे ?????? मला तर वेगवेगळ्या ठिकाणी काटे लागून रक्त
हि यायला सुरुवात हि झाली होती. जंगलात काटे चुकऊन वाट कडे पर्यत आम्ही हे
पण विसरून गेलो होतो कि आम्ही किल्ल्याचा रस्ता शोधत आहोत. बरयाच वेळाने
आम्हाला कळून चुकल कि आम्ही जंगलात नुसत फिरतोय. लवकरात लवकर काही करून
आम्हाला किल्ला दिसण्या जोग्या जागेवर जाण गरजेच होत. पण एवढ्या जंगलातून
किल्ला दिसणार तरी कसा ? मग विचार केला कि उंच झाडावर चढून किल्ला पाहावा.
ते पण केल आम्ही त्यावेळी. पण एवढ्या विचित्र जागी आम्ही अडकलो होतो कि
काहीच दिसण्या सारख न्हवतच. बराच विचार करून ठरलं कि अजून एक मोठा डोंगर
पाहून त्यावरून किल्ला दिसतो कि नाही हे पहाव. कारण जेव्हा झाडावर चढलो
होतो तेव्हा शेजारीच एक मोठा डोंगर दिसला होता. ठरलं तर मग या डोंगरावर चढून
किल्ला शोधावा. आणि म्हणता - म्हणता आम्ही डोंगर चढायला घेतला पण. टोकावर
पोहचल्यावर कळलं कि आम्ही जंगलात रस्ता शोधण्याच्या नादात बरयाच प्रमाणात
डाव्या बाजूला चालत गेलो होतो. परंतु एकदाचा किल्ला दिसला. आता दिशा तरी
कळली कि कोणत्या बाजूला जायचं आहे. डोंगर उतरायला सुरुवात झाली. आता डोंगर
उतरायचा म्हणजे परत जंगलात घुसावं लागणार होत. तरी स्वताला सावरत सावरत
आम्ही खाली उतरत होतो. रस्त्यात आम्हाला काही तरी पायातून एकदम उडत गेल्याच
दिसलं. थोड वेळाने कळंल कि ती जंगली कोंबडी होती आणि ती जेव्हा उडून
गेली तेव्हा आम्हाला त्या ठिकाणी तिची अंडी दिसून आली. ते पाहून मग आम्ही
पुढचा प्रवास सुरु केला. वाटत होत कि जाताना उतारच तर आहे बघता बघता होईल.
पण जेवढा वेळ चढायला लागला तेवढाच वेळ खाली उतरायला लागला. बरयाच वेळाने
आम्हाला किल्ला दिसायला लागला आणि मी तर अजूनच जोरात खाली उतरायला लागलो.
वाटल कि संपला एकदाचा जंगलचा रस्ता आणि अस म्हणता म्हणता माझा पाय जमिनीवर
पसरलेल्या आणि मुख्य म्हणजे डोळ्यांना न दिसणाऱ्या वेलींमध्ये अडकला आणि
मला काही कळायच्या अगोदरच मी चक्क माझ्या दोन्ही गुडघ्यांवर बसलो होतो.
आता फक्त एवढच बाकी होत कि माझा उताराच्या बाजूने तोल जाऊन मी नाकाने खाली
पडायच. पण मी त्यावेळी स्वताला कस - कस सावरलं. पण थोड्या प्रमाणात त्यावेळी
मला माझ्या पायात लचक भरल्याच जाणवलं. त्यामुळे थोडा आराम करायच ठरलं.
अश्यावेळी भरपूर पाणी पिणे मला योग्य वाटलं. परत तीच राहिलेली वाट संपवत
आम्ही चालू लागलो. थोड्या वेळातच आम्ही एका शेतात पोहचलो. आणि यावेळी
मात्र आम्हाला पूर्ण दिवसात पहिल्यांदा माणसाच दर्शन झाल. आंम्ही त्या काकांना आम्ही
या वेळी कुठे आहोत असा प्रश्न केला ? खरतर आम्हालाच हसायला येत होत अशा
वेळी. मग त्या काकांनी आम्ही शिरशिंगे गावात आहोत अस सांगितलं. आणि बरीच
माहिती आम्ही त्यावेळी त्यांच्या कडून घेतली आणि शेवटी किल्ल्याचा रस्ता
विचारून आम्ही मार्गक्रमण सुरु केलं. तिथूनच थोड पुढ आल्यावर आम्ही आमच
जेवण हि उरखून घेतल. राकेश ने मस्त पैकी नारळ आणि शेंगदाण्याची सुखी चटणी
आणि पोळ्या आणल्या होत्या. आहा आह काय मजा येत होती खाताना . बस खाऊन इथेच झोपावं अस वाटत होत.
काकांच्या सांगण्यावरून
आम्ही रस्ता शोधत शोधत परत किल्ल्याच्या दिशेने चालत होतो आणि परत अजून एक
डोंगर आम्हाला पार करायचा होता या वेळी. विचार केला कि हा डोंगर न चढता
अजून याला कोणता जर पर्यायी मार्ग भेटला तर त्यानेच जायचं. कारण तिथे बरेच
रस्ते पसरलेले होते. पण का कोण जाने तो विचार तसाच मारून आम्ही तोच डोंगर
सर करायचा ठरवलं. कारण त्यावेळी त्या भागात मोठ्या प्रमाणात जंगल तोड चालली
होती त्यामुळे तिथे एवढे रस्ते झाले होते. जर आम्ही चुकून परत कुठे तरी
भलत्याच ठिकाणी बाहेर पडलो असतो तर परत एकदा गोंधल उडाला असता. आमच्या
अंदानानुसार आणि काकांनी सांगितलेल्या माहिती नुसार हा आमचा कदाचित शेवट्चा
डोंगर असणार अस आमच म्हणन होत. आणि आम्ही एकदाचे डोंगराच्या टोकाला पोहचलो
आणि आमचा अंदाज बरोबर ठरला. समोर उभा होता तो मनोहर - मनसंतोषगड किल्ला.
किल्ला म्हणण्यापेक्षा मोठी भिंतच म्हणा. त्यात मात्र दोन भाग एक लहान आणि
एक मोठा. बस किल्ला डोळ्यासमोर पाहताच दिवस भरातला पूर्ण थकवा निघून गेला.
आम्ही हे पाहून खाली उतरायला सुरुवात केली. बघता बघता आम्ही खाली पोहचलो
हि. खाली आलो तर गाड्यांचा आवाज. म्हणजे आता किल्ल्यावर जायला गाडी रस्ता
आमच्या समोर होता. चालता - चालता मोठी नदी लागली. गाडी रस्ता जवळ असताना
आणि किल्ला नजरे समोर मग घाई का करायची. कारण आत्ता कुठे दुपार झाली होती.
लवकर बाहेर निघण्याचा हा एक फायदा होतो. त्यामुळे आम्ही बराच वेळ तिथे
घालवायच ठरवलं. सुरुवातीला तर आम्ही एक मस्त पैकी झाड पाहून आमची चटई तिथे
पसरली ( त्यावेळी carry mat किवा sleeping bag असल काही नव्हत). आणि पुस्तक
वाचत वेळ घालऊ लागलो. आता एवढा वेळ करणार तरी काय, वेळ तर घालवायचा
होताच. राकेशच्या डोक्यात कुठून काय कल्पना आली काय माहित तो सरळ उठला
तो डायरेक्ट पाण्यात जाऊन बसला. साहजिकच आहे एवढा घामागुम झालेला माणूस
पाणी समोर असताना कसा काय गप्प बसून राहणार. मग काय राकेशचा पाण्यातला आराम
चालूच होता. बराच वेळ त्याने पाण्यात मजा मारून घेतली. अन मी पण त्यावेळी जरा कॅमेरा वर हात मारून घेत होतो.
बघता
बघता कधी ३ वाजून गेले कळलच नाही. दोघांनीही आता निघायच पक्क केल. राकेशने
आपली अंघोळ आटोपती घेतली एकदाची. आणि आमचा भर उन्हात पुढील प्रवास सुरु
झाला. आता रस्ताच असल्या कारणाने आम्ही निवांत होतो पण थोड्या वेळातच
आम्हाला कळून चुकल कि हा रस्ता दिसतो तेवढा काही सोपा नाही. सूर्य देव तर
आमच्यावर फारच प्रसन्न होते. अस वाटत होत कि जणू आता आपण जळून गायबच होणार
त्यामुळे चालताना फार थकवा लागत होता आणि आडोशाला फक्त काही झाड. रस्ता हि
चढ असलेला आता या सगळ्यापेक्षा जंगल चागलं अस वाटत होत. तासाभरात आम्ही
किल्ल्याच्या पायथ्याला असणारया गोठवे गावात पोहचलो. तो पर्यंत संध्याकाळ
झालीच होती. तिथे एका दुकानात फरसाण आणि लोकल थंडाची बॉटल घेऊन आम्ही थोडा
आराम केला. थोड्या वेळातच आम्ही एका झाडाखालील कुंडातून थंड पाणी भरून घेऊन
पुढील प्रवास सुरु केला. परत एकदा वाट काढत काढत आम्ही एकदाचे किल्लाच्या
पायथ्याला पोहचलो. पण हि शेवटची चढाई मात्र श्वास धरून ठेवणारी होती.
जवळपास नाकासमोर चढ येत होता.
एकदाचा किल्ला दिसला आता
वर जायचं
कस ? कारण गोठवे गावातील लोकांनी सांगितल्या प्रमाणे रस्ता हा समोरच्या
बाजूने असायला हवा पण समोरच्या बाजूला दरी दिसत होती. त्यावेळी विचार केला
कि शेजारच्या बाजूने रस्ता असेल. म्हणून आम्ही किल्ल्याच्या उजव्या बाजूने
पुढे चालायला घेतलं. आणि इथेच आमचा निर्णय चुकला आम्ही किल्ल्याच्या
उजव्या बाजूने चालत राहिलो. जवळ जवळ आम्ही किल्ल्याच्या दुसरया बाजूला
म्हणजेच शिवापूर गावाच्या दिशेला बाहेर पडलो. तरी राकेशने मनोहर -
मनसंतोषगड किल्ल्याच्या मध्ये जाण्याचा प्रयत्न केला. आणि जवळपास एका
किल्ल्याच्या मध्यापर्यंत तो पोहचला हि होता. पण अंधार बराच पडला होता.
राकेशच्या म्हणण्यानुसार आम्ही वर जाऊ शकलो असतो पण रस्ता जरा खराब असल्या
मुळे उतरताना त्रास झाला असता म्हणून तो हि परत मागे आला. आता अंधार बराच
पडत चालला होता. आणि आम्हाला लवकरात लवकर निर्णय घ्यायचा होता. कारण मागे
हि गेलो तर परत रस्ता चुकण्याचीच भीती होती. शेवटही ठरलं कि खाली जाणारया
मोठ्या रस्त्याने खाली उतरून बाहेर पडाव. अस म्हणून आम्ही मन मारून खाली
उतरायला सुरुवात केली. किल्ल्याच्या पायथ्याला पोहचल्या पासून ते परत
विरुद्ध दिशेने खाली उतरायला सुरुवात केल्यानंतर आम्ही तेवढाच भाग खूप मिस
केला. कारण आमचा त्यावेळी झालेला पहिला स्पर्श, तिथून पाहिलेली किल्ल्याची
पहिली तटबंदी, आणि हळू हळू किल्ल्यापासून दूर जाण्यासाठी झालेली सुरुवात अन
ते हि किल्ला न पाहताच. अक्षरश: मन मारत आम्ही खाली उतरत होतो. खरतर
इच्छाच राहिली नव्हती.
जंगलाचा भाग भरभर
संपवून एकदाचे आम्ही शिवापूर गावात पोहचलो. खरतर आम्ही त्या गावात
पोहचल्यावर आम्हाला कळलं कि त्या गावच नाव शिवापूर आहे ते. असो. आम्ही
तेथील एका घरात आमच्या पाण्याच्या बाटल्या भरून घेतल्या आणि तेथील आजीबाईना
परत गोठवे गावाला जायचा रस्ता विचारून घेतला कारण आमच्याकडे अजून हि बराच
वेळ होता म्हणून आणि परत गोठवे च्या दिशेने चालायला सुरुवात केली. तस
बघायला गेल तर रस्ता गाडी चालण्या इतपत मोठा होता. फरक फक्त एवढाच कि त्याच
डांबरीकारण झाल नव्हत. आम्हाला फार वेळ न घेता जवळपास १४ कि. मी. पार
करायचं होत. त्यामुळे पाठीवरच ओझ तसच घेऊन आम्ही माना खाली घालून चालत
होतो. समोर दिसत होती ती गोठवे वाडीच्या येथील खिंड. बस काही करून लवकरात
लवकर तिथे पोहचायचं. नाही म्हणता म्हणता अंधार शेवटी पडलाच आणि आम्हाला Bag
मधून Torch बाहेर काढावी लागलीच. Torch च्या मदतीने आम्ही रस्ता मोजत
चाललो होतो. रस्त्यात मध्येच कुटे तरी गाड्या आम्हाला समोरून येताना दिसत.
कदाचित लग्नाला गेलेली लोक होती ती. आणि आम्ही जवळ पास ८
वाजल्याच्या सुमारास खिंडीत पोहचलो आणि आम्हाला गोठवे गावातील लाईटस
दिसायला लागल्या. चेहरयावर एक प्रकारचा आनंद हि होता आणि निराशा हि कारण
आता परत गोठवे गावापर्यंत जायचं होत. परत आम्ही पायांना जोर देऊन चालायला
सुरुवात केली. जवळपास ८:३० च्या सुमारास आम्ही एका पठारापर्यंत पोहचलो
तिथेच थोडा वेळ थांबायचा विचार केला. कारण खालून गावामधून बरयाच ठिकाणावरून
मोठ - मोठ्याने गाण्यांचे आवाज येत होते. आम्ही अंदाज घातला कि गावात
लग्नांचा गोंधळ चालू असणार आहे. म्हणजे खाली गावात जाऊन राहण्यात त्यावेळी
काही तथ्य नव्हत तर. मग काय आता बसलोच आहोत तर म्हटलं टाकावी इथेच पडी.
अगोदरच दिवसभर चालून चालून आलेला थकवा आणि त्यात हा गाण्यांचा आवाज आम्हाला
आता नको होता. ठरलं तर मग आणि आम्ही तिथेच आमची चटई पसरली. माझ्या bag
मध्ये त्यावेळी राकेश ने सावंतवाडी हून ट्रेकसाठी आणलेले ब्रेड आणि जॅम
होताच. आम्ही लगेच बूट बाजूला काढून खायला सुरुवात केली. पण परत निराशाच.
कारण या वेळी ब्रेड ची मोडून चक्क भाजी झाली होती. आता या ब्रेड च्या
भाजीला जॅम लावायचा तरी कसा. शेवटी राकेशने ब्रेड तसाच खायला सुरुवात केली.
आणि मी बोटांनी नुसता जॅम. आमच्या कडे अननस हि होत म्हटलं ते तरी खाव तर
कुठे काय ते पण कच्च. चला परत त्याची पण जागा bag मधेच. मग काय भरपूर पाणी पिऊन आम्ही लगेच झोपायला हि घेतलं. कारण दुसरया दिवशी सकाळी लवकर उठून पहिली गाडी पकडून आम्हाला घरी जायचं होत. रात्री गाण्यांच्या आवाजामुळे झोप तशी लवकर नाही लागणार होती आणि नंतर कुठे झोप लागायला सुरुवात होणार तेवढ्यात गावातल्या भटक्या कुत्र्यांनी आपल्या भुंकण्याच्या स्पर्धेचा आलाप सुरु केलाच. आता काय अजून एक वाईट अनुभव. लागली एकदाची झोप. डोळा उघडला तो डायरेक्ट दुसरया दिवशीच.
जरा
उठायला उशीरच झाला. सकाळी मी चटई सोडून जमिनीवर लोळत होतो तर राकेश
स्वतःचा गोळा करून झोपला होता. संपूर्ण अंग जड जड वाटत होत. तोंडावर पाणी
मारलं आणि सर्व सामान आवरायला घेतलं. दुसऱ्या दिवसाची सुरुवात परत
चालण्यापासुनच झाली. तरीही गोठवे गावापर्यंतच जायचं होत म्हणून ठीक.
पाठीमागे परत दिसत होता तो किल्ला. पण आम्ही ठरवल होत कि आता परत कधी तरी
येऊन याचा माथा गाठायचाच. आणि आम्ही याच विचारात गावात पोहचलो. आणि अजून १
धक्का लागायला आम्हाला वेळ लागली नाही. आणि तो धक्का असा होता कि आम्ही
आमच्या प्लान मध्ये ठरवल होत त्याप्रमाणे सकाळी कॉलेज गाडी पकडून घरी जायचं
पण रात्री ती गाडी आलीच नव्हती. मग काय बसलो तिथे थोडा वेळ आणि परत पायी -
पायी डांबरी रस्ता पकडून शिरशिंगेच्या दिशेने चालू लागलो. अंतर तस अंदाजे
१० कि. मी. च होत. पण मला मात्र ते जवळपास ३० कि. मी च वाटत होत. कारण आता
माझे पाय बोलू लागले होते. जवळपास माझे पाय अर्ध्या - अर्ध्या फुटांनी पुढे
सरकत होते. राकेश त्याच्या स्पीड मध्ये बराच पुढे निघाला होता. मी मात्र
कासवाच्या गतीने पाय घासून पुढे सरकवत होतो. पण अंगातला किडा काही मेला
नव्हता माझ्या. तारेवर बसलेल्या बी - इटर चा देखील मी फोटो काढत होतोच. आणि
कसा - कसा मी एकदाचा एका गावापर्यंत पोहचलो. पाहतो तर राकेश अगोदरच एका
ठिकाणी बसला होता. त्याला विचारल काय झाल रे ? तर तो म्हणाला कि हा बस stop
आहे आणि थोड्याच वेळात बस येणार आहे अस गाववाल्यांनी सांगितलं आहे. माझ्या
चेहरयावर एक प्रकारच हास्य उमटलं त्यावेळी. आणि मी हि थोड्या वेळातच तिथे
बसायला मोकळा झालो. आता वाट फक्त वाट बघायची होती ती बसची. आणि बस आली.
आम्ही निवांत खिडकी शेजारची जागा पकडून सुटकेचा श्वास सोडला. कंडक्टर आला
आम्ही माडखोल पर्यंतच तिकीट काढल. जी बस सुरुवातीला संपूर्ण रिकामी होती ती
थोड्या वेळातच पूर्णपणे भरून गेली. पण आम्हाला आता त्याच काही घेण -
देण नव्हत कारण आम्हाला जागा मिळाली होती बसायला. आता जरी कुणी
आमच्या ओळखीच पण आल असत तरी आम्ही त्याला जागा दिली नसती. कारण आम्हाला
त्या जागेत स्वर्गातल सुख मिळत होत.
आणि म्हणता
म्हणता गाडी माडखोल ला पोहचली ही. आता परत गाडी बदलायची वेळ आली होती.
आम्ही माडखोल ला उतरलो आणि आंबोलीच्या दिशेने जाणारया गाडीची वाट पाहायला
लागलो. आणि खरच काही वेळातच बेलगाव गाडी समोर येऊन उभी. पण गाडीत तशी जागा
नव्हती तरीही आम्ही गाडीत बसलोच. कारण आम्हाला घरी जायचं होतच मग ते कसही
का असेना. नशीब चांगल जस - जस दाणोली गाव जवळ आल तशी हळू हळू जागा दिसायला
लागली. आम्ही एक एक करून सीट वर बसून घेतलं. आणि घाट सुरु झाल्या - झाल्या
थंड हवा सुरु झाली आणि कधी झोप लागली काही कळलच नाही. नंतर डायरेक्ट डोळा
उघडला तो आंबोली बस stop वर. गाडी सोडली आणि तसाच पाय घासत घासत मी एकदाचा
घरी पोहचलो.
मला अजून हि चांगलच आठवतंय त्यानंतर मी माझ्या पायांमुळे सलग दोन दिवस घरातून बाहेर पडलो नव्हतो. :)
राकेशने घेतलेलं अननस आठवत का. ते हि त्याने घरी आणून ३ -४ दिवसांनी पिकऊन खालं.
आणि
अजून हि बरयाच वेळा मला या ट्रेकची आठवण येते. ज्या - ज्या वेळी मी
महादेवगड किल्ल्यावर जातो तेव्हा समोर दिसणारा तोच किल्ला मला बोलवत आहे अस
वाटत. आम्ही त्यावेळी केलेला किडा आणि आमची हुकलेली संधी सांगायला आम्हाला
अजूनहि मजा येते.
साईली ने आणि राहुल ने आम्ही हरवलो होतो म्हणून मला नंतर परत कधी न हरवण्यासाठी आनंद पाळंदे याचं " डोंगरयात्रा " नावाच आणि ज्यात खास करून रस्त्यांचे नकाशे असतील अस पुस्तक भेट दिल ते हि माझ्या वाढदिवसाला. खरच महोहर - मनसंतोषगड बरयाच आठवणी मागे ठेऊन गेलाय........!
आणि अजूनही माझा तो किल्ला नाही झाला आहे.
abhi.narvekar01@gmail.com